त्रिशूर; वृत्तसंस्था : केरळमधील त्रिशूरमधील इरिंजलकुडा येथील कुडलमणिक्यम मंदिरात बिगर हिंदूंना प्रवेशबंदी कायम ठेवण्यात आली आहे. गतवर्षी एप्रिल महिन्यात हिंदू नसलेल्या एका महिला भरतनाट्यम् कलावंताला मंदिराच्या प्रांगणातील रंगमंचावर सादरीकरणास मज्जाव करण्यात आला होता. त्यावरून वाद निर्माण झाला होता. आता कला सादरीकरणासाठी बिगर हिंदू कलावंतांकरिता प्रांगणाबाहेर रंगमंच उभारणी करण्यात आली आहे. देवस्थानाचे अध्यक्ष यू प्रदीप मेनन यांनी ही माहिती दिली.
भगवान श्रीराम यांचे बंधू भरत यांना समर्पित देशातील हे एकमेव मंदिर असून, नलम्बलम मंदिर समूहातील ते एक आहे. नलम्बलममध्ये राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांना समर्पित चार मंदिरे आहेत. सन 854 मध्ये स्थापन झालेल्या या मंदिरांत बिगर हिंदूंना प्रवेश बंदी आहे.
एर्नाकुलम : केरळमधीलच एर्नाकुलम येथील तिरुवैरानिकुलम महादेव मंदिरात दर्शनासाठी आलेल्या अमला पॉल या विख्यात दाक्षिणात्य अभिनेत्रीला प्रवेश नाकारण्यात आला. अमला पॉल ही सोमवारी (16 जानेवारी) मंदिरात दर्शनासाठी
आली होती. मंदिराच्या अधिकार्यांनी तिला या आवारात फक्त हिंदूंनाच परवानगी असल्याचे सांगितले. अमला हिने स्वत: ही गोष्ट बोलून दाखविली आहे.