पुढारी ऑनलाईन डेस्क : 'सरकारच्या उद्दामपणाचे वर्णन करण्यासाठी शब्द नाहीत, लोकशाहीचा गळा घोटला जात आहे, अशा शब्दांमध्ये खासदार निलंबन प्रकरणी काँग्रेसच्या माजी अध्यक्षघ सोनिया गांधी ( Sonia Gandhi ) यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.
संसद भवन येथील संविधान सदनच्या सेंट्रल हॉलमध्ये काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या की, केंद्र सरकारने लोकशाहीचा गळा घोटला आहे. यापूर्वी एवढ्या मोठ्या संख्येने विरोधी संसद सदस्यांना सभागृहातून निलंबित करण्यात आले नव्हते. ते एक अतिशय वाजवी आणि न्याय्य मागणी करत होते तरीही त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.