नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी बुधवारी त्यांच्या हायड्रोजन इंधनावर चालणार्या टोयोटा मिराई या कारमधून (hydrogen car) संसदेत आले. गडकरींनी नेहमीच पर्यायी इंधनाची बाजू लावून धरली आहे आणि आता त्यांनी हायड्रोजन हे भविष्यातील इंधन असल्याचे दाखवून दिले आहे.
ते म्हणाले, आत्मनिर्भर बनण्यासाठी आम्ही ग्रीन हायड्रोजन (hydrogen car) सादर केला आहे, जो पाणीपासून निर्माण केला जातो. ही कार म्हणजे एक पायलट प्रोजेक्ट आहे. आता देशात ग्रीन हाइड्रोजनचे उत्पादन सुरू झाले आहे. त्यातून इंधनर आयातीवर नियंत्रण राहणार असून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.
सरकारने 3000 कोटी रुपयांचे अभियान सुरू केले असून लवकरच भारत ग्रीन हायड्रोजनची निर्यात करणारा देश बनले. देशात जिथे जिथे कोळशाचा वापर केला जातो तिथे तिथे ग्रीन हायड्रोजनचा वापर केला जाईल. दिल्लीत मी तुम्हाला याच कारमधून प्रवास करताना दिसेन. त्यातून ग्रीन हायड्रोजन इंधन वापराबाबत लोकांनाही प्रोत्साहन मिळेल.
हायड्रोजन इंधन फरिदाबाद येथील इंडियन ऑईलच्या पंपावर भरले जाईल. कंपनीच्या मते, या कारमध्ये केवळ पाच मिनिटात इंधन भरता येऊ शकते. एकदा टाकी भरली की 646 किलोमीटर अंतर कापता येते.
टोयोटा किर्लोस्कर मोटार आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नोलॉजीने हा अभ्यास करण्यासाठी हा एक पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे. त्याचाच भाग म्हणून टोयोटा मिराई ही हायड्रोजन कार भारतीय रस्त्यांवर चालवली जात आहे.
इलेक्ट्रिक वाहनांमुळे खर्चात बचत (hydrogen car)
संसदेत बोलताना गडकरी म्हणाले की, आगामी दोन वर्षांत या इलेक्ट्रिक गाड्यांच्या किमती पेट्रोलवर चालणार्या वाहनांच्या बरोबरीला येईल. हे पर्यायी इंधन राष्ट्रीय राजधानीतील प्रदूषणाचा स्तरही कमी करेल. लिथियम-आयन बॅटरीच्या किमतीही कमी होत आहेत. आम्ही झिंक-आयन, अॅल्युमिनियम-आयन, सोडियन-आयन बॅटरी विकसित करण्यावर काम करत आहोत. पेट्रोलसाठी तुम्हाला 100 रुपये खर्च करावे लागत असतील तर इलेक्ट्रिक वाहनावर तुम्हाला 10 रुपये खर्च करावा लागले.
अशी धावेल ग्रीन हायड्रोजन असलेली कार (hydrogen car)
ग्रीन हायड्रोजन म्हणजे काय? (hydrogen car)
ग्रीन हायड्रोजन हे पारंपरिक इंधनाला पर्याय असलेले इंधन आहे. कुठल्याही वाहनात त्याचा वापर केला जाऊ शकतो. मध्यम आणि दूरच्या पल्ल्याच्या प्रवासासाठी हे इंधन विश्वासार्ह मानले जात आहे.
गडकरींच्या उत्तरावरून राज्यसभेत हास्याचे फवारे
राज्यसभेत बुधवारी भाजप खासदार रूपा गांगुली यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींना कार्ससाठी स्टार रेटिंगवरून प्रश्न विचारला.
त्या म्हणाल्या की, दोन-तीन वर्षे जुन्या असलेल्या गाड्यांची इंजिन्स चांगली असतात. तर अशा गाड्यांना ही सुविधा देता येऊ शकते का? त्यावर गडकरी म्हणाले की, रेटिंग प्रणाली नव्या गाड्यांसाठी आहे. जुन्या गाड्यांना असे रेटिंग देणे कठिण आहे. ज्या प्रमाणे चरित्र भूमिका केल्यानंतर पुन्हा नायिकेची भूमिका साकारणे कठीण जाते, तसेच हे आहे. गडकरींच्या या उत्तरावर पूर्वाश्रमीच्या अभिनेत्री रूपा गांगुलींसह सर्वच सदस्यांमध्ये हास्याचा स्फोट झाला.