Latest

Zojila Tunnel : ‘अंदाजित’पेक्षा कमी खर्चात पूर्ण होणार आशियाचा मोठा बोगदा

अमृता चौगुले

श्रीनगर; वृत्तसंस्था : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जोझिला बोगद्याची पाहणी केली. साधारणपणे 14 कि.मी. लांबी असलेला हा बोगदा आशियातील सर्वात मोठा बोगदा आहे. कामाचा वेग, नियोजन यामुळे अगदी सुरुवातीच्या अंदाजित खर्चापेक्षा (12 हजार कोटी रुपये) कमी खर्चात (4900 कोटी रुपये) तो पूर्ण होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. प्रचंड बर्फवृष्टी आणि हिमस्खलनामुळे (नोव्हेंबर ते मे) राज्यमार्ग बंद असतो. या काळात लडाखचा काश्मीरशी संपर्क तुटतो. बोगदा तयार झाला की, ही समस्या संपुष्टात येईल. सोनमर्ग और द्रास शहरादरम्यान हिमालयात या बोगद्याचे काम सुरू आहे. 2026 पर्यंत ते पूर्ण होईल. (Zojila Tunnel)

बोगद्याचे ठळक फायदे (Zojila Tunnel)

  • जोझिला बोगदा गांदरबल जिल्ह्यातील बालटालला लडाखच्या कारगिल जिल्ह्यातील द्रासशी जोडेल.
  • सोनमर्ग ते मीनामर्ग प्रवासाला सध्या 4 तास लागतात. बोगदा झाला की, 40 मिनिटांत हे अंतर कापता येईल.

हा इतिहासही घडला

गडकरी म्हणाले, या बोगद्यावरील खर्चही एखाद्या प्रकल्पाच्या अंदाजित खर्चात 5 हजार कोटींवर बचतीचे देशातील पहिलेच उदाहरण आहे. (Zojila Tunnel)

हेही जाणून घ्या…

जोझिला पास नियंत्रण रेषेनजीक आहे. सामरिक दृष्टीनेही हा बोगदा महत्त्वाचा ठरेल. पाकिस्तानने जोझिला पासवर कब्जा जमविला होता. ऑपरेशन बायसन राबवून भारतीय लष्कराने तो पूर्ववत ताब्यात घेतला होता.

कालक्रम

  • मे 2018 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कामाला सुरुवात
  • ऑक्टोबर 2020 : 15 ऑक्टोबर 2020 रोजी नितीन गडकरी यांनी बोगदा खणण्यासाठी पहिला स्फोट केला.
  • एप्रिल 2023 : गडकरींकडून प्रत्यक्ष कार्यस्थळावर प्रगतीचा आढावा

वैशिष्टे

  • 15 ऑक्टोबर 2020 रोजी काम सुरू
  • 14 कि.मी. लांबीचा
  • 365 दिवस म्हणजे वर्षभर सुरू राहणार
  • 4 ही ऋतूंत, हवामानांत राहणार खुला
  • छक-1 श्रीनगर-कारगिल-लेह राष्ट्रीय महामार्गावर एकवर
  • 11, 578 फूट उंच समुद्रसपाटीपासून
  • 6, 809 कोटी रुपये अंदाजित खर्च
  • 3.30 तासांची बचत; जोझिला लवकर पास
  • 5 वर्षे बांधकाम पूर्णत्वाचा अपेक्षित कालावधी
  • 2026 पर्यंत पूर्ण होणार प्रकल्प
  • 2 लेन संख्या

भारतासह जगभरातील लोक पर्यटनासाठी स्वित्झर्लंडला पसंती देतात. खरे तर काश्मीर हे स्वित्झर्लंडपेक्षाही सुंदर आहे. येत्या 3-4 चार वर्षांत काश्मीरमधील रस्ते वाहतूक व पायाभूत व्यवस्था आम्ही अमेरिकेच्या तोडीची करणार आहोत. जोझिला बोगदा तयार झाला की, बघा काश्मीरमधील पर्यटनात तिप्पट वाढ झाल्याशिवाय राहणार नाही. हा बोगदा म्हणजे संपूर्ण काश्मीर खोरे कन्याकुमारीशी जोडण्याच्या स्वप्नपूर्तीतील एक टप्पा आहे.
– नितीन गडकरी,
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT