Latest

Niraj Singh Rathod : मंत्री बनवण्याची ऑफर देणारा नीरजसिंह राठोड नागपूर पोलिसांच्या जाळ्यात; ऑडिओ क्लीप व्हायरल

backup backup

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून शिंदे- भाजप सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर 20 ते 22 मे दरम्यान हा विस्तार मंत्रिमंडळ होणार असा दावा करत महाराष्ट्रातील ४ आमदारांना मंत्री बनविण्याची ऑफर एका भामट्याने दिली आहे. नीरजसिंह राठोड असे या व्यक्तीचे नाव आहे. या आरोपीला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे.

नीरजसिंह राठोड हा तोतया स्वत:ची ओळख करुन देत असताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा पीए आहे असे सांगतो. संघ मुख्यालय आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरातील दोन आमदारांसह महाराष्ट्रातील चार आमदारांना फोन करून मंत्री करण्याची ऑफर त्याने दिली आहे. या तोतया पीएने दोन दिवसांच्या जेवणाचे बिल देण्यासाठी दडपण आणतो. "नड्डा यांचा मूड कर्नाटक निकालाने ठीक नाही, दोन तीनदा त्यांनी आठवण काढली, पैसे लवकर खात्यावर टाका" असे तो आमदारांना सांगतो. याविषयीची आमदार कुंभारे आणि दोघांची ऑडिओ क्लिप आज व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली. नागपूर मध्यचे भाजप आमदार विकास कुंभारे यांचे पीए राजेश यांनी तहसील पोलिसात याची तक्रार केली.

आमदार कुंभारे बाहेर असल्याने त्यांनी नागपूर पोलिसांशी संपर्क साधून फोनवर घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. अखेरीस पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचे मार्गदर्शनात गुन्हा दाखल करून विशेष पथकामार्फत नीरजला मोबाईलसह गुजरातमधून अटक केली. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत. याशिवाय आरोपीने आतापर्यंत किती आमदारांना फोन करून पैसे मागितले याची माहिती देखील पोलिस घेत आहेत. तपासानंतर सर्व बाबींचा उलगडा होईल अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त मुम्माका सुदर्शन यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT