TV Series Lampan  
Latest

TV Series Lampan : कादंबरी ‘वनवास’वर आधारित सीरीज ‘लंपन’ लवकरच

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनी लिव्‍हवरील नवीन ओरिजिनल सीरीज 'लंपन'मध्‍ये मराठी साहित्‍याची जादू अनुभवा. प्रकाश नारायण संत यांची लोकप्रिय कादंबरी 'वनवास'वर आधारित या निरागस व आत्‍म-शोधाच्‍या हृदयस्‍पर्शी कथेमध्‍ये मिहिर गोडबोले यांनी प्रतिष्ठित भूमिका लंपन साकारली आहे. ही सीरीज १६ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. (TV Series Lampan) ही सीरीज तरुण मुलगा लंपनच्‍या आत्‍म-शोधाच्‍या प्रयत्‍नांच्‍या कथेला सादर करते. मिहिर प्रमुख भूमिकेत असलेल्‍या या सीरीजमध्‍ये प्रतिभावान कलाकार देखील आहेत. लंपनच्या 'आजी'च्‍या भूमिकेत गीतांजली कुलकर्णी, त्‍याच्‍या आजोबाच्‍या भूमिकेत चंद्रकांत कुलकर्णी, त्‍याची जिवलग मैत्रिण सुमीच्‍या भूमिकेत अवनी भावे आणि त्‍याच्‍या वडिलांच्‍या भूमिकेत पुष्‍कराज चिरपुटकर व त्याच्‍या आईच्‍या भूमिकेत कादंबरी कदम असेल. (TV Series Lampan)

आपल्‍या भूमिकेबाबत सांगताना गीतांजली म्‍हणाल्‍या, "मी प्रकाश नारायण संत जी यांच्‍या लक्ष वेधून घेणाऱ्या कथा ऐकत मोठे झाले आणि त्‍यांच्‍या कथांमधील जादुई विश्‍वाने नेहमी माझे लक्ष वेधून घेतले. आता, त्‍यांच्‍या लोकप्रिय कलाकृतीमधील एका पात्राची भूमिका साकारताना मला खूप आनंद होत आहे. लंपनच्‍या आजीची भूमिका साकारण्‍याचा अनुभव अद्वितीय आहे. तिला प्रेमाने आजी म्‍हणून हाक मारतात. ती लंपनवर प्रेमाचा वर्षाव करते, तसेच त्‍याला मार्गदर्शन देखील करते, आपुलकी दाखवण्‍यासह शिस्‍तबद्धतेचे धडे देते. जुन्‍या आठवणींकडे घेऊन जात ही सीरीज तुम्‍हाला सहजगत्या काळाचा अनुभव देते, जेथे कौटुंबिक नाते आणि बालपणातील निरागसतेला अधिक महत्त्व दिले जाते."

निपुण धर्माधिकारी दि‍ग्‍दर्शित या सीरीजचे निर्माते श्रीरंग गोडबोले, ऋषिकेश देशपांडे, अमित पटवर्धन आहेत. लंपन सीरीज १६ मेपासून पाहता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT