Latest

Nike, Adidas चे आता भारतात उत्पादन! २८१ दशलक्ष डॉलरची गुंतवणूक, २० हजार नव्या नोकऱ्यांची संधी

दीपक दि. भांदिगरे

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]

पुढारी ऑनलाईन : तैवानची आघाडीची फुटवेअर उत्पादन कंपनी पॉउ चेनची (Pou Chen) उपकंपनी भारतात सुमारे २८१ दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणार असल्याची माहिती आहे. ही उत्पादन सुविधा तामिळनाडूमध्ये उभारली जाणार आहे. फुटवेअर कंपनीची भारतातील अनेक गुंतवणुकीपैकी ही पहिली गुंतवणूक असेल, जी Nike, Adidas, Timberland आणि New Balance सारख्या ब्रँडसाठी शूज बनवण्यासाठी ओळखली जाते. या गुंतवणुकीमुळे भारतात २० हजार नोकऱ्यांची निर्मिती होणार असल्याचे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

याबाबत पॉ चेनचे उपाध्यक्ष जॉर्ज लिऊ यांची तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्याशी बैठक झाली. या बैठकीत त्यांनी सांगितले "आम्हाला आशा आहे की भारतातील अनेक गुंतवणुकीपैकी ही पहिली गुंतवणूक असेल." Pou Chen ने आर्थिक वर्ष २०२२ मध्ये जागतिक स्तरावर २७२ दशलक्ष शूज जोड्यांचे (pairs of shoes) उत्पादन घेऊन ते विक्रीसाठी पाठवले. हे उत्पादन याआधीच्या वर्षापूर्वीच्या तुलनेत सुमारे १४ टक्क्यांनी जास्त आहे. त्यांचे बांगला देश, कंबोडिया, म्यानमार आणि व्हिएतनाममध्ये प्लँट्स आहेत.
या गुंतवणुकीमुळे १२ वर्षांत तामिळनाडूमध्ये २० हजार नोकऱ्या निर्माण होऊ शकतात, असे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

याआधी तमिळनाडूमध्ये फुटवेअर युनिट स्थापन करण्यासाठी हाँग फू ग्रुपने १ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा करार केला आहे. त्यानंतर वर्षभरानंतर आणखी एक तैवानची फुटवेअर उत्पादक कंपनी तामिळनाडूत गुंतवणूक करणार आहे.

कंपनीचे उच्चपदस्थ अधिकारी आणि स्टेट इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सी तामिळनाडू यांच्यात गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सामंजस्य करार झाला होता. या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट २० हजार नोकर्‍या निर्माण करणे आहे. ज्यात बहुतांश कर्मचारी महिला असतील.

या करारांतर्गत गुंतवणूक पुढील ३-५ वर्षांत टप्प्याटप्प्याने केली जाईल आणि हे युनिट फुटवेअर निर्यातीलाही चालना देईल. हाँग फू कंपनी पुमा, कॉन्व्हर्स आणि नायके यांसारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँडसाठी शूज बनवते. तामिळनाडूने गेल्या पाच वर्षांत भारताच्या फुटवेअर निर्यातीपैकी ४५ टक्के उत्पादन घेतले आहे. त्यात Gucci आणि Giorgio Armani या आघाडीच्या ब्रँडचा समावेश आहे.

तामिळनाडूमध्ये उत्पादन प्रकल्प उभारणारी पॉउ चेन ही एकमेव जागतिक कंपनी नाही. ॲपल पुरवठादार फॉक्सकॉन, पेगट्रॉन आणि सॅलकॉम्प यांनी देखील तमिळनाडूसह देशातील अन्य भागांत त्यांचे उत्पादन वाढवणार आहेत. कारण ते उत्पादनात विविधता आणू पाहत आहेत.

[web_stories title="true" excerpt="true" author="false" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="1" order="DESC" orderby="post_date" view="list" /]

 हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT