पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India For New Zealand Tour : टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर टीम इंडियाला न्यूझीलंडचा दौरा करायचा आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने (BCCI) सोमवारी (31 ऑक्टोबर) भारताच्या संघाची घोषणा केली. भारताला न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. या मालिकेसाठी टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर संघाच्या कर्णधार पदी हार्दिक पांड्याची निवड करण्यात आली आहे. तर वनडे संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी शिखर धवनकडे सोपवण्यात आली आहे.
टी 20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी 20 मालिकेला 18 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. 22 नोव्हेंबरला या मालिकेतील शेवटचा सामना खेळला जाईल. यानंतर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होईल. ही मालिका 25 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत रंगणार आहे.
पहिला टी 20 सामना : 18 नोव्हेंबर : दुपारी 12.00 वाजता, वेलिंग्टन
दुसरा टी 20 सामना : 20 नोव्हेंबर : दुपारी 12.00, माउंट मौनगानुई
तिसरा टी 20 सामना : 22 नोव्हेंबर दुपारी 12.00 वाजता, नेपियर
पहिली वनडे : 25 नोव्हेंबर : सकाळी 7.00 वाजता : ऑकलंड
दुसरी वनडे : 27 नोव्हेंबर : सकाळी 7.00 वाजता : हॅमिल्टन
तिसरी वनडे : 30 नोव्हेंबर : सकाळी 7.00 वाजता : क्राइस्टचर्च
हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार, विकेटकीपर), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, के. यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक
शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार, विकेटकीपर), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक
न्यूझीलंड दौऱ्यानंतर भारतीय संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. पहिल्यांदा दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे आणि त्यानंतर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतून रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली पुनरागमन करतील. तर दुसरीकडे या मालिकेतून हार्दिक पंड्याला विश्रांती देण्यात आली आहे. रोहित शर्मा बांगलादेशविरुद्धच्या वनडे आणि कसोटी मालिकेत कर्णधार असेल. त्याचबरोबर केएल राहुल उपकर्णधार असेल.
दरम्यान, रजत पाटीदार याला वनडे संघात संधी देण्यात आली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत रजतचा समावेश करण्यात आलेला नाही. त्याला नुकत्यात झालेल्या द. आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला होता, मात्र त्याला पदार्पण करता आले नाही.
त्याचबरोबर राहुल त्रिपाठीलाही संधी देण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज यश दयाल हा संघातील नवा चेहरा असेल. यश हा आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्स संघाकडून खेळला. बांगलादेश दौऱ्यातून रवींद्र जडेजा संघात पुन्हा एकदा एन्ट्री घेईल. जडेजा दुखापतीमुळे सप्टेंबरमध्ये झालेल्या आशिया कप स्पर्धेपासून संघाबाहेर आहे. शमीही या मालिकेतून पुनरागमन करेल.
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, यश दयाल.
त्याचबरोबर केएस भरत आणि कुलदीप यादव यांचा कसोटी मालिकेसाठी संघात समवेश करण्यात आला आहे. राखीव विकेटकीपर म्हणून भरतचा समावेश केला आहे. पंतच्या गैरहजेरीत तो विकेटच्या मागील जबाबदारी सांभाळेल. चायनामन गोलंदाज कुलदीप प्रदीर्घ कालावधीनंतर कसोटीत परतणार आहेत. कुलदीपने फेब्रुवारी 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती.
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भारत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.