पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत हा जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश… जगातील सर्वांत वैविध्यपूर्ण देश… भारताच्या सार्वभौमत्वाचे दिमाखदार प्रतीक ठरेल, अशीच इमारत देशाच्या संसदेसाठी असावी, ही संकल्पना 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कागदावर मांडली… आणि त्यांच्याच कार्यकाळात आज लोकशाहीच्या या सार्वभौम मंदिराचे उद्घाटन होत आहे. पंतप्रधान मोदी संसदेची नवीन वास्तू आज देशाला समर्पित करणार आहेत. नव्या संसद भवनाचा हा महासोहळा सध्या सुरू आहे.
LIVE Updates :
- नवीन संसद भवनाच्या लोकार्पण सोहळ्याचा दुसरा टप्पा दुपारी १२ च्या सुमारास सुरू होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करणार आहेत.
- पंतप्रधान मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री नवीन संसद भवनात सुरू असलेल्या बहु-विश्वास प्रार्थना सभेला उपस्थित आहेत.
- नवीन संसद भवनात उद्घाटनानंतर 'सर्वधर्म' प्रार्थना करण्यात आली.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर संसदेची उभारणी करणाऱ्या कामगारांचा सत्कार केला.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कोनशिलेचं उद्घाटन करण्यात आले.
- तामिळनाडूतून खास या सोहळ्यासाठी दाखल झालेल्या संतांनी पंतप्रधान मोदी यांना ऐतिहासिक सेंगोल (राजदंड) शनिवारी सुपूर्द केला होता. या राजदंडाचे पुजन पंतप्रधान मोदी यांनी केले. त्यानंतर पंतप्रधानांनी संसद भवनात राजदंड स्थापित केला. संसदेच्या नवीन इमारतीत स्थापनेपूर्वी अधेनामांच्या वैदिक मंत्रोच्चारात राजदंडाला अभिषेक करण्यात आला.
- पंतप्रधान मोदी 'सेंगोल'समोर नतमस्तक झाले
- या सोहळयासाठी पंतप्रधान मोदी संसद भवनात दाखल झाले असून महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ काही धार्मिक विधी केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत लोकसभेचे अध्यक्षही सहभागी झाले आहेत.
आज पंतप्रधान मोदी संसदेची नवीन वास्तू देशाला समर्पित करत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, खासदार तसेच इतर नेते कार्यक्रमात यावेळी उपस्थित राहणार आहेत. दोन सत्रांत उद्घाटन सोहळा होणार आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.