file photo  
Latest

नाशिकमध्ये नेपाळी तरुणाची गळा चिरुन हत्या, शहर हादरलं

गणेश सोनवणे

सातपुर पुढारी वृत्तसेवा – नाशिक शहरातील सातपूर परिसरात एका 19 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. हा तरुण सातरपूरमधील कामगार नगर भागातील एका हॉटेलमध्ये काम करत होता. खून झालेला तरुण हा मूळचा नेपाळमधील असल्याची माहिती आहे. तो नाशिकमध्ये उदरनिर्वाहासाठी आला असल्याचे समजते. महेंद्र सिंग असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

धारधार शस्राने गळा चिरलेल्या अवस्थेतील त्याचा मृतदेह आढळून आला आहे.

अधिक माहितीनुसार,  सातपूर परिसरातील गुलमोहर कॉलनी येथील कौशल्य व्हिला फ्लॅट नंबर एक हा तरुण राहत होता. महेंद्र सिंग असे या तरुणाचे नाव असून धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या केल्याची  घटना आज सकाळी उघडकीस आली. हा युवक नेपाळ येथील राहणारा असून तो कामगारनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये कुकिंग चे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या युवकाची हत्या कोणत्या कारणातून झाली आहे हे अद्याप समोर आलेले नसून त्याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस उपायुक्त शेखर देशमुख, अंबड विभाग तसेच सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT