Assembly Polls 2024

‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’, जाहीरनामा उद्या

अनुराधा कोरवी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीसाठी 'राष्ट्रासाठी राष्ट्रवादी ' या थिमवर आधारित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात येणार आहे. सोमवारी चर्चगेट येथील एमसीए लाऊंज येथे सकाळी साडेअकरा वाजता या जाहीरनाम्याचे प्रकाशन केले जाईल, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे यांनी शनिवारी दिली.

राष्ट्रवादी भवनमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, या जाहीरनामा प्रकाशन सोहळ्याला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, वाय.पी. त्रिवेदी, बाबा सिद्दीकी, रूपाली चाकणकर, समीर भुजबळ, अनिल पाटील, सुरज चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीपराव वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सदरचा जाहीरनामा तयार केला आहे.या पत्रकार परिषदेला पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव आणि प्रवक्ते संजय तटकरेदेखील उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT