आग्रा; पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेशमधील आग्रातील मलपुरा भागात ड्रॉपिंग जोनमध्ये पॅराजम्पिंग करताना एका जवानाचा मृत्यू झाला. हा जवान ड्रॉपिंग जोनमधून बाहेर आला होता. पण, लँडिंग वेळी हायव्होल्टेज तारांमध्ये पॅराशूट अडकले. त्यानंतर पॅराशूटला आग आगली आणि त्यातच जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ग्रामस्थांनी जखमी जवानाला रुग्णालयात पोहचवले. मात्र पोहचता क्षणी जवानाचा मृत्यू झाला होता. ही घटना गुरुवारी (दि. ११) रात्री साडे अकराच्या सुमारास घडली.(Navy Commando Died)
स्थानिक ग्रामस्थ फौरन सिंह या घटने बाबत माहिती देताना म्हणाले, मी माझ्या शेतात झोपलो होतो. रात्री मी बघितले की हायव्होल्टेज तारांमध्ये एक पॅराशूट अडकले आहे. काहीवेळाने त्याच्यातून एकजण खाली पडला. जवळपास आर्धातासाने मी तेथे पाहण्यास गेलो तेव्हा अंकुश शर्मा नावाचा जवान जखमी अवस्थेत पडला होता. यानंतर मी याची माहिती फोनवरुन पोलिस आणि सैन्यात असणाऱ्या माझ्या भावाला दिली. (Navy Commando Died)
पोलिस घटनास्थळी पोहचले नाहीत, त्यामुळे ग्रामस्थांनीच त्या जवानास खांद्यावर उचलून रुग्णालयात घेऊन गेले. यानंतर वायुसेनेचे लोक आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पण, उपचारा दरम्यान अंकुश शर्मा या जवानाचा मृत्यू झाला. (Navy Commando Died)
ड्रॉपिंग झोनमधून बाहेर आला जवान
मालपुरा ड्रॉपिंग झोनजवळील नागला बघेल येथे हा अपघात झाला. कमांडो अंकुश शर्मा हवाई दलाच्या विमान AN-32 मधून 1500 फुटांपेक्षा जास्त उंचीवर पॅराशूट जंम्प करत होते. ते ड्रॉपिंग झोनपासून सुमारे 1.5 किमी बाहेर आले. यानंतर हा जवान हायटेंशन लाइनमध्ये अडकला. यासंदर्भात हवाई दलाचे अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाहीत.
जम्मू-काश्मीरचा रहिवासी होता अंकुश
अंकुश शर्मा मूळचा जम्मू-काश्मीरचा आहे. तो भारतीय नौदलात तैनात होता. एअरफोर्स स्टेशन येथील पॅराट्रूपर ट्रेनिंग स्कूलमध्ये तो पॅरा जम्पिंग प्रशिक्षणासाठी आला होता. मालपुरा ड्रॉपिंग झोनमधील ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अनेक घटना घडल्या आहेत. दीड वर्षातील ही दुसरी घटना आहे.
अधिक वाचा :