Marathi tv serial  
Latest

New Marathi Serials : ‘नवरी मिळे हिटलरला’ आणि ‘पुन्हा कर्तव्य आहे’ आजपासून

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : झी मराठीवर पारू आणि शिवानंतर आता 'नवरी मिळाले हिटलरला' आणि 'पुन्हा कर्तव्य आहे' ह्या दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला १८ मार्चपासून येत आहेत. (New Marathi Serials ) हिंदी मालिका आणि मराठी चित्रपटातला हँडसम चेहेरे म्हणजेच अक्षय म्हात्रे आणि राकेश बापट या मालिकांमध्ये नायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'पुन्हा कर्तव्य आहे' मध्ये अक्षय म्हात्रे आकाशची भूमिका साकारत आहे, जो दोन गोड मुलींचा बाबा आहे. त्याची साथ देणार आहे अक्षया हिंदाळकर, जी वसुंधरा ची भूमिका साकारत आहे. वसुंधरा ही एका मुलाची आई आहे. कसे हे दोन अपूर्ण कुटुंब पूर्ण होणार हे पाहायला मिळणार आहे. (New Marathi Serials)

दुसरीकडे 'नवरी मिळे हिटलरला' मध्ये अभिराम जहागीरदारची भूमिका साकारत आहे राकेश बापट आणि त्याची साथ देत आहे वल्लरी विराज जी लीला साकारत आहे. AJ ओळखला जातो मिस्टर परफेक्टशनिस्ट म्हणून, ज्याचं व्यक्तिमत्व आहे डॅशिंग, जो अतिशय शिस्तबद्ध आहे आणि ज्यात वक्तशीरपणा आहे. ज्यामुळे त्याला "हिटलर" हे टोपणनाव मिळाले आहे. AJ साठी नवरी शोधण्याची मोहीम त्याच्या तीन सुनांनी सुरु केली आहे. हिटलरच्या नवरीची भूमिका साकारत आहे अभिनेत्री वल्लरी विराज जिच्या भूमिकेचं नाव आहे लीला.

लीला बहिर्मुख आहे. सर्वांची मदत करणे हाच तिचा उद्देश असतो पण लीलाची लीला इतकी अपरंपार आहे की, मदतीसाठी दिलेला हात काही तर घोळ घालून जातो. लीला जेव्हा अभिरामला भेटेल तेव्हा काय होणार हे बघण्याची मज्जाच वेगळी असणार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT