मुंबई; पुढारी ऑनलाईन : ठाकरे सरकारकडून गणेश उत्सवानंतर आता दसऱ्यासाठी navratri 2021 नियमावली जारी केली आहे. नवरात्रोत्सवासाठी ठाकरे सरकारने नियमावली जारी करताना गरबा आणि दांडियाच्या आयोजनाला बंदी घातली आहे. देवीची मूर्ती आणि मंडपावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये म्हटले आहे की, नवरात्रोत्सवासाठी मंडप उभारण्यासाठी पूर्वपरवानगी लागेल. परवानगी ऑनलाईन घेता येणार आहे, तसेच कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. निश्चित केलेल्या नियमांच्या अधीन राहूनच परवानगी दिली जाईल.