Latest

राणा दाम्‍पत्‍य ३६ दिवसांनी अमरावतीला परतणार, मारूती मंदिरात राणा-राष्‍ट्रवादी समर्थक पुन्हा आमने-सामने ?

निलेश पोतदार

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठणासाठी घराबाहेर पडलेल्‍या राणा दाम्पत्याचं आज (शनिवार) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास नागपुरातील विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी अमरावतीहून शेकडो कार्यकर्ते विमानतळावर दाखल झाले. विमानतळावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून राणा दांपत्य हनुमान चालीसा पठणाकरीता राम नगर येथील मंदिराकडे रवाना झाले.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आज ३६ दिवसांनी अमरावतीत परतणार आहेत. मात्र त्यापूर्वी पुन्हा एकदा हनुमान चालिसा पठणावरुन राजकीय संघर्ष पाहायला मिळू शकताे. कारण दिल्लीहून नागपुरात परतलेले राणा दाम्पत्य रामनगर परिसरातील मारुती मंदिरात हनुमान चालीसा पठण करणार आहे. पोलिसांनी त्यांना काही अटी-शर्तींसह हनुमान चालीसा पठणाला परवानगी दिली आहे. मात्र त्याच मंदिरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देखील हनुमान चालिसा पठणाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे राणा समर्थक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सीआरपीसीच्या कलम १४९ अंतर्गत नोटीस बजावली आहे. लाऊडस्पीकरचा वापर करु नये, मंदिरासमोर अवास्तव गर्दी जमवू नये, प्रक्षोभक वक्तव्य करू नये अशा सूचना पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपुरातील पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

हे ही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT