राष्ट्रीय

२४ केंद्रीय मंत्र्यांवर गंभीर स्‍वरुपाचे गुन्‍हे : ‘एडीआर’च्‍या अहवालातील माहिती

नंदू लटके

नवी दिल्‍ली ; पुढारी ऑनलाईन :  ४२ टक्‍के केंद्रीय मंत्र्यांवर गुन्‍हे दाखल आहेत. यातील २४ केंद्रीय मंत्र्यांवर खून, खूनाचा प्रयत्‍न, दरोडा अशा गंभीर स्‍वरुपाचे गुन्‍हे दाखल आहेत. अशी माहिती असोसिएशन फॉर डेमॉक्रटिक रिफॉर्म्स (एडीआर) आपल्‍या अहवालात दिली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्‍तारामध्‍ये ३६ नव्‍या चेहर्‍यांना संधी देण्‍यात आली. मंत्र्यांची एकुण संख्‍या ही ७८ झाली आहे. यापैकी ३३ मंत्र्यांवर (४२ टक्‍के) गुन्‍हे दाखल आहेत. यातील २४ जणांवर खून, खूनाचा प्रयत्‍न, दरोडा अशा गंभीर स्‍वरुपाचे गुन्‍हे दाखल आहेत. २०१९च्‍या लोकसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्‍या उमेदवारी अर्जाबरोबर दखल करताना सादर केलेल्‍या प्रतिज्ञापत्रातून 'एडीआर'ने ही महिती दिली आहे.

एडीआर

९० टक्‍के मंत्री करोडपती

आपल्‍या अहवालात 'एडीआर'ने स्‍पष्‍ट केले आहे की, केंद्रीय मंत्रिमंडळातील ९१ टक्‍के मंत्री (७० मंत्री) हे कोट्यधीश आहेत.  सर्वाधिक संपत्ती असणारे चार मंत्री पुढीलप्रमाणे. कंसात त्‍यांच्‍या नावावरील संपती. ज्‍योतिरादित्‍य शिंदे (३७९ कोटी), पियुष गोयल (९५ कोटी), नारायण राणे (८७ कोटी) आणि राजीव चंद्रशेखर (६४ कोटी).

मंत्र्यांची सरासरी संपत्ती ही १६.२४ कोटी

२०१९च्‍या लोकसभा निवडणुकीनंतर स्‍थापन झालेल्‍या केंद्रीय मंत्रिमंडळातील ५६ मंत्र्यांवर गुन्‍हे दाखल झाले होते.केंद्रीय मंत्र्यांची सरासरी संपत्ती ही १६.२४ कोटी आहे.

सर्वात कमी संपत्ती असणारे मंत्री पुढीलप्रमाणे, कंसात त्‍यांच्‍या नावावरील संपती त्रिपुराच्‍या प्रतिमा भौमिक (६ लाख ), पश्‍चिम बंगालचे जॉन बारला (१४ लाख ), राजस्‍थानचे कैलाश चौधरी (२४ लाख ), ओडिशाचे बिशवेश्‍वर तुडू (२७ लाख ) आणि व्‍ही. मुरलीधरण (२७ लाख ),नूतन केंद्रीय मंत्रिमंडळातील ८२ टक्‍के मंत्र्यांचे शिक्षण हे पदवी किंवा त्‍यापेक्षा जास्‍त आहे. १२ मंत्र्यांचे हे आठवी ते १२वीपर्यंत शिक्षण घेतलेले आहे. १७ जणांनी पदवी, २१ जणांनी पदव्‍युत्तर तर ९ मंत्र्यांचे डॉक्‍टरेट केली आहे.

हेही वाचलं का ?

व्‍हिडिओ पहा : मधमाशांनी दयावानचं आयुष्‍य बनवलं मधाळ

SCROLL FOR NEXT