Hathras stampede news
हाथरस चेंगराचेंगरी घटनेनंतर भोले बाबांची पहिली प्रतिक्रिया.  Pudhari Photo
राष्ट्रीय

हाथरस चेंगराचेंगरी घटनेनंतर भोले बाबांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,"आम्ही दु:खी..."

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात नारायण साकार विश्व हरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या भोले बाबाच्या सत्‍संग कार्यक्रमानंतर झालेल्‍या चेंगराचेंगरीत १३३ भाविकांचा मृत्‍यू झाला आहे. या घटनेनंतर पहिल्यांदाच  सूरजपाल उर्फ ​​भोले बाबाचे वक्तव्य समोर आले आहे. त्यांनी म्हटलं आहे, "आम्ही खूप दु:खी आहोत, देव आम्हाला या दु:खाच्या काळातून बाहेर पडण्याची शक्ती देवो"  Hathras stampede news 

काय म्हणाले भोले बाबा?

  • हाथरस येथील सत्‍संग कार्यक्रमानंतर झालेल्‍या चेंगराचेंगरी घटनेनंतर आम्ही दु:खी.

  • देव आम्हाला या दु:खाच्या काळातून बाहेर काढेल.

  • सरकार आणि प्रशासनावर विश्वास ठेवा.

आम्ही खूप दु:खी

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात नारायण साकार विश्व हरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या भोले बाबाच्या सत्‍संग कार्यक्रमानंतर झालेल्‍या चेंगराचेंगरीत आतापर्यंत १३३ भाविकांचा मृत्‍यू झाला आहे. या घटनेनंतर पहिल्यांदाच सूरजपाल उर्फ ​​भोले बाबाचे वक्तव्य समोर आले आहे. हाथरस चेंगराचेंगरीच्या घटनेवर सूरजपाल उर्फ ​​'भोले बाबा' यांनी एका व्हिडिओ निवेदनात म्हटले आहे की, "२ जुलैच्या घटनेनंतर आम्ही खूप दु:खी आहोत. देव आम्हाला या दु:खाच्या प्रसंगातुन बाहेर पडण्याची शक्ती देवो. सर्व सरकार आणि प्रशासनावर विश्वास ठेवा. गैरप्रकार करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असा आम्हाला विश्वास आहे. मी माझे वकील ए.पी. सिंह यांच्या माध्यमातून समिती सदस्यांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी शोकाकुल कुटुंबीय आणि जखमींच्या पाठीशी उभे राहून त्यांना मदत करावी.'

मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकरला अटक 

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात नारायण साकार विश्व हरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या भोले बाबाच्या सत्‍संग कार्यक्रमानंतर झालेल्‍या चेंगराचेंगरीत आतापर्यंत १३३ भाविकांचा मृत्‍यू झाला आहे. ही घटना  मंगळवारी (दि.२) रोजी घडली होती. याप्रकरणी मुख्य आरोपी  देव प्रकाश मधुकर याला शुक्रवारी (दि.५) रात्री उशिरा दिल्लीतील उत्तम नगर येथून अटक करण्यात आली. देव प्रकाश मधुकर हा मंगळवारी (दि.२) हातरस येथे झालेल्या भीषण अपघातानंतर फरार झाले होता. देव प्रकाश मधुकर हा भोले बाबांच्या जवळचे असल्याचे सांगितले जाते. Hathras stampede  

SCROLL FOR NEXT