राष्ट्रीय

‘हर घर तिरंगा’ अभियानात दहा लाखांना रोजगार

backup backup

नवी दिल्ली : वृत्तसंस्था स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देशातील जनतेतून तिरंग्याला अभूतपूर्व मागणी होती. ती पूर्ण करण्यासाठी 20 दिवसांच्या विक्रमी वेळेत 30 कोटींहून अधिक तिरंग्यांची निर्मिती देशातील उद्योजकांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या 'हर घर तिरंगा' अभियानाने त्यांच्याच 'आत्मनिर्भर भारत' या उपक्रमाला मोठे प्रोत्साहन दिले. देशभरात 30 कोटींहून अधिक राष्ट्रध्वजांची विक्री झाली. यातून जवळपास 500 कोटी रुपयांचा व्यवसाय झाला. देशभक्‍ती आणि स्वयंरोजगाराच्या या संयुक्‍त अभियानाने देशभरात एक अद्भुत भावना निर्माण झाली आहे.

केंद्र सरकारने ध्वजसंहितेत केलेल्या बदलांमुळेही देशभरात ध्वज सहज उपलब्ध होण्यास मोठा हातभार लागला. ध्वजसंहितेतील या दुरुस्तीमुळे देशातील 10 लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळाला. स्थानिक टेलर्सनाही यामुळे काम मिळाले. भारतीय तिरंग्याची वार्षिक विक्री 150-200 कोटी रुपयांपर्यंत होते. 'हर घर तिरंगा' अभियानामुळे अनेक पटींनी (500 कोटी रुपये) त्यात वाढ झाली.

SCROLL FOR NEXT