राष्ट्रीय

हज यात्रेसाठी व्हीआयपी कोटा रद्द

दिनेश चोरगे

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  केंद्रीय मंत्रिमंडळाने हज यात्रेमधील व्हीआयपी कोटाही रद्द केला आहे. त्यामुळे आता राखीव ठेवण्यात येणार्‍या जागाही आपोआप रद्द होऊन सामान्य हज यात्रेकरूंना यात्रेची संधी साधता येणार आहे. या निर्णयानुसार, भारताचे पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, अल्पसंख्याकमंत्री तसेच हज समितीचे सदस्य यांच्यासाठी राखीव असलेल्या जवळपास सर्व व्हीआयपी कोट्याच्या जागा रद्द करण्यात आल्या आहेत.

त्यामुळे यापुढे कुणालाही यापुढे 'विशेष व्यवस्था' किंवा आरक्षण असणार नाही. 2012 मध्ये व्हीआयपी कोटा लागू केला होता. त्यानुसार पाच हजार सीटस् राखीव ठेवण्यात येत असत. आता त्याचा लाभ सर्वसामान्य यात्रेकरूंना मिळणार आहे.

SCROLL FOR NEXT