बेंगलोर, पुढारी ऑनलाईन : देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पुर्ण झाले आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त कू मराठीने स्वांतत्र्याचा अमृतमहोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
हा कार्यक्रम १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ ते ५ या वेळेत ऑनलाईन पार पडला.
कार्यक्रमाच कू ॲपच्या वापरकर्त्यांनी सहभागी होऊन देशाच्या ७५ वर्षांच्या प्रवासाबद्दल सांगितले. 'कू'च्या वापरकर्त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचे विचार मांडले.
गेल्या आठवड्याभरापासून या कार्यक्रमाची तयारी सुरू होती.
कार्यक्रमात सहभागीसाठी होण्यासाठी एक ऑनलाईन फॉर्म भरण्यास सांगण्यात आले होते.ज्यांनी फॉर्म भरला होता. त्यांना 'कू'मधून कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी फोन करण्यात आले .
त्यासोबतच ॲपवर गेल्या आठवड्याभरापासून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा हॅशटॅग ट्रेंड करण्यात येत होता.
गेल्या आठवड्याभरापासून लोकं ह्या हॅशटॅगचा वापर करुन त्यांचे विचार ॲपवर मांडत होते.
त्यामूळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना त्यांचे विचार लोकांसमोर मांडण्याची संधी मिळाली होती.
यात सहभागी झालेल्या प्रेक्षकांनी देशाचा या ७५ वर्षांमधील प्रवास, देशातील अडचणी, नवीन शोध, शेती, शिक्षण अशा वेगवेगळ्या विषयांवर आपली मत मांडत चर्चत सहभाग घेतला.
सुखदा राव यांनी सूत्रसंचालन केले. योगेश देओर यांनी आभार मानले.
आरती झेंजरे, रुपाली बोरसे, खुशाली डोके, डॉ.अनिल कुलकर्णी, स्वप्ना कुलकर्णी अशा अनेकांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचे विचार मांडले.