पुढारी वृत्तसेवा : भारताला स्वावलंबी बनवणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्यासाठी आयात कमी करून देशातच मालाचे उत्पादन वाढवण्याच्या हेतूने केंद्र सरकारने विविध क्षेत्रांमध्ये पीएलआय योजना म्हणजेच उत्पादन लिंक्ड प्रोत्साहन योजना सुरू केली आहे. या योजनेचे दृश्य परिणाम आता दिसू लागले आहेत. या योजनेअंतर्गत निर्यात वाढवल्याबद्दल संबंधित उत्पादकांना सरकारकडून प्रोत्साहनपर रक्कम दिली जाते.
निर्यातीत अशी झाली वाढ
इंजिनिअरिंग वस्तू 12 टक्के
औषधनिर्मिती उद्योग 4.83 टक्के
मोबाईल फोनचा धडाका
मोबाईल फोनच्या निर्मितीत भारताने आघाडी घेतली आहे. जागतिक पातळीवर 2021-22 मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 26.15 टक्क्यांनी वाढ झाली. याच्या उलट भारतात याच वाढीचा वेग आहे तब्बल 126.11 टक्के.