उज्जैन; वृत्तसंस्था : उज्जैन येथील खासदार अनिल फिरोजिया यांना त्यांनी स्वत:चे 32 किलो वजन घटविल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून मोठी भेट मिळालीआहे. फिरोजिया यांना त्यांच्या मतदारसंघाच्या विकासांतर्गत 2300 कोटी रुपयांच्या योजनांना गडकरींनी मंजुरी दिली आहे.
गडकरी यांनी 23 फेब्रुवारी 2022 रोजी फिरोजिया यांना स्वत:चे वजन कमी करण्याचे आव्हान दिले होते. जितके किलो ते घटवतील तितके हजार कोटी रुपये त्यांना विकासासाठी दिले जातील, असा या आव्हानाचा आशय होता. फिरोजिया यांनी 3 महिन्यांत 12 किलो आणि 7 महिन्यांत 32 किलो वजन घटवून दाखविले. गडकरींनीही वचन पाळले. 32 हजार कोटी रुपयांपैकी 2300 कोटी रुपये मंजूर केले आहेत. आव्हान दिले गेले तेव्हा फिरोजिया यांचे वजन 130 किलो होते. पंतप्रधान मोदी जेव्हा 'महाकाल लोक' प्रकल्पाचे लोकार्पण करायला उज्जैनला आले होते, तेव्हा त्यांनीही फिरोजियांचे कौतुक केले होते.