राष्ट्रीय

रेजिमेंटनुसारच अग्निवीरांची भरती

मोहन कारंडे

भारतीय लष्करात अग्निवीरांची भरती करताना उमेदवाराला जात-धर्म विचारला जात असल्याच्या विषयावरून सध्या वाद उफाळला आहे. सैन्य भरतीच्या इतिहासात उमेदवारांना प्रथमच जात आणि धर्म विचारण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. मात्र, सरकारच्या म्हणण्यानुसार, ही प्रणाली ब्रिटिश काळापासून म्हणजेच सुमारे दोनशे वर्षांपासून चालत आली आहे. तिचा जात किंवा कोणत्याही धर्माचा दुरान्वयानेही संबंध नाही. रेजिमेंटनुसार सैन्य भरतीची प्रक्रिया पार पाडली जाते. नुकताच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही तसा स्पष्ट निर्वाळा दिला आहे.

रेजिमेंट स्थापना

1) पंजाब 1761
2) पॅराशूट 1945
3) मद्रास 1758
4) ग्रेनेडियर्स 1778
5) मराठा लाईट इन्फंट्री 1768
6) राजपुताना रायफल्स 1775
7) राजपूत 1778
8) जाट 1795
9) शीख 1846
10) शीख लाईट इन्फंट्री 1857
11) डोगरा 1877
12) गढवाल रायफल्स 1887
13) कुमाऊ 1813
14) आसाम 1941
15) बिहार 1941
16) महार 1941
17) जम्मू-काश्मीर 1821
18) जम्मू-काश्मीर लाईट इन्फंट्री 1947
19) 1 गोरखा रायफल्स 1815
20) 4 गोरखा रायफल्स 1857
21) 3 गोरखा रायफल्स 1815
22) 9 गोरखा रायफल्स 1817
23) 5 गोरखा रायफल्स 1858
24) 8 गोरखा रायफल्स 1824
25) 11 गोरखा रायफल्स 1918
26) नागा 1970

पंजाब रेजिमेंट सर्वात जुनी

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने 10 डिसेंबर 2021 रोजी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्करात एकूण 26 इन्फंट्री रेजिमेंटस् आहेत. रेजिमेंट याचा अर्थ तुकडी. त्यातील सर्वात जुनी म्हणजे पंजाब रेजिमेंट. या रेजिमेंटची स्थापना 1705 मध्ये करण्यात आली होती. सर्वात नवी नागा रेजिमेंट असून, तिची स्थापना 1970 मध्ये झाली. भरती होताना प्रत्येक उमेदवाराला रेजिमेंटबद्दल विचारणा केली जाते आणि नंतर त्याबद्दल उचित निर्णय घेतला जातो.

स्रोत : डब्ल्यू डब्ल्यू कोरा डॉट कॉम

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT