राष्ट्रीय

येत्या पाच वर्षांत 56 टक्के युजर्स वापरणार फाईव्ह जी

दिनेश चोरगे

देशात बहुचर्चित फाईव्ह जी सेवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 1 ऑक्टोबर रोजी झाले. या पार्श्वभूमीवर येत्या पाच वर्षांत देशातील 56 टक्के मोबाईलधारक फाईव्ह जी सेवेचा वापर करतील, असे निरीक्षण एरिक्सन मोबिलिटीच्या अहवालात नोंदवण्यात आले आहे. त्याचबरोबर फोर जी सेवेचे काय होणार, आधीचे सिम निरुपयोगी तर होणार नाही ना, असे प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाले आहेत.

 सेटिंग ऑन करावे लागणार

फाईव्ह जीसाठी नवे सिम घ्यावे लागणार नाही. फोर जी सिममध्येच तुम्हीच फाईव्ह जी सेवेचा वापर करू शकता. त्यासाठी आपल्या स्मार्टफोनमध्ये आवश्यक सेटिंग ऑन करावे लागेल. रिचार्जही फाईव्ह जी पॅकनुसारच करावा लागणार आहे. अर्थात ही सेवा एअरटेल ग्राहकांसाठी आहे.

पडताळणी गरजेची

 वास्तविक सध्या लाँच होणार्‍या जवळपास सगळेच स्मार्ट फोन फाईव्ह जी सेवा देण्याएवढे कार्यक्षम आहेत. तथापि, फाईव्ह जी सेवेच्या वापरापूर्वी तुमच्या मोबाईलमध्ये फाईव्ह जी सेवा कार्यक्षम असणार आहे की नाही ते तुम्हाला पडताळावे लागेल.

फाईव्ह जी सेवा किंचित महागडी

फाईव्ह जी सेवेसाठी सध्याच्या पॅकचा विचार केला तर त्यापेक्षा 30 ते 40 टक्के जादा रक्कम तुम्हाला मोजावी लागेल. अर्थात विविध कंपन्यांनी याबद्दल अजूनही स्पष्ट घोषणा केलेली नाही.
2030 पर्यंत देशातील एकूण कनेक्शनपैकी एक तृतीयांशपेक्षा अधिक फाईव्ह जी असणार. टू जी आणि थ्री जीचा वाटा 10 टक्क्यांहूनही कमी असेल.

  2025 पर्यंत 87 टक्के भारतीय कुटुंबांकडे असेल इंटरनेट कनेक्शन

  • 2025 पर्यंत देशातील 87 टक्के भारतीय कुटुंबांकडे असणार इंटरनेट कनेक्शन.
  •  निम्म्याहून अधिक ऑनलाईन खरेदीदार सोशल प्लॅटफॉर्मवरून उत्पादने खरेदी करतील.
  •  नागरी भागातील एकूण कुटुंबांच्या संख्येपैकी निम्म्या कुटुंबांकडे स्मार्टफोनखेरीज किमान एक स्मार्ट डिव्हाईस असेल.
  •  देशात 18 दशलक्ष आणि 80 दशलक्ष शहरी कुटुंबे स्मार्ट टीव्ही, स्मार्ट सेट टॉप बॉक्स आणि इतर स्मार्ट उपकरणांचा वापर करत आहेत. 2025 पर्यंत अशा कुटुंबांची संख्या 50 दशलक्षपर्यंत वाढेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT