Worli Hit And Run
वरळीत हिट अँड रन  File Photo
राष्ट्रीय

मुंबई : वरळीत हिट अँड रन; महिलेचा मृत्यू, कारचालक ताब्यात

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईमधील वरळीत हिट अँड रनची घटना. मासळी खरेदी करुन दुचाकीवरुन जाणाऱ्या दाम्पत्याला बीएमडब्ल्यू कारने फरपटत नेले. यात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला आहे. गाडी शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांची असल्याच समोर आले आहे. कारमध्ये शाह यांचा मुलगा आणि कारचालक होता. अपघातानंतर फरार झालेल्या कारचालकाला ताब्यात घेतले आहे. Worli Hit And Run

महिलेचा मृत्यू; पती बजावला

माहितीनुसार कोळी दाम्पत्य ससून डॉकवरुन मासळी खरेदी करुन घरी जात होते. दरम्यान . वरळीमधील अॅट्रीया मॉलजवळ कारने मागुन धडक देत फरपटत नेले. जखमी महिलेला तात्काळ नजिकच्या हॉस्पिटलमध्ये नेले असता. डॉक्टरांनी मृत घोषीत केले. महिलेच्या पतीने गाडीवरुन उडी मारल्याने त्यांचा जीव वाचला. अपघातानंतर कारचालक फरार झाला होता. त्याला ताब्यात घेतले आहे.

गाडीत शिवसेनेच्या उपनेत्याचा मुलगा

ज्या बीएमडब्ल्यू कारने कोळी दाम्पत्यला फरपटत नेले.ती कार शिंदे शिवसेनेचे उपनेते राजेश शाह यांची असुन कारमध्ये राजेश शाह यांचा मुलगा मिहिर शाह आणि कारचालक होता. अपघातानंतर कार चालक फरार झाला होता. त्याला ताब्यात घेतले आहे.

शिवसेना उपनेत्याचा मुलगा आणि कारचालका वर गुन्हा दाखल

मिहिर शाह हा अपघातानंतर आपल्या मित्रांकडे गेला होता. पोलिसांचे पथक मिहिरच्या मित्रांकडे गेले आहे. त्यांचीही चौकशी केली जाणार आहे. दरम्यान मिहिर शाह आणि कारचालकावर गुन्हा दाखल झाला आहे.

गाडी कोण चालवत होते?

अपघातामधील कार ही पालघरमधील शिवसेनेचे उपनेते राजेश शाह यांची आहे. अपघातानंतर राजेश शाह यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गाडी कोण चालवत होते याचे उत्तर राजेश शाह यांनी कारचालक चालवत होता म्हटलं आहे. पण जखमींनी मिहिर शाह गाडी चालवत होता असल्याचे म्हटलं आहे.

SCROLL FOR NEXT