राष्ट्रीय

बंगळूर : चामराजपेट येथील इदगाह मैदानावर गणेशोत्सवास नकार

दिनेश चोरगे

नवी दिल्‍ली; पुढारी वृत्तसेवा : बंगळुरातील चामराजपेट येथील इदगाह मैदानात गणेशोत्सव साजरा करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. मंगळवारी याबाबतचा आदेश देताना मैदानावरील स्थिती 'जैसे थे' ठेवण्याची सूचना देण्यात आली.

या मैदानावर गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी देण्याची मागणी करुन सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने सुनावणी केली. इदगाह मैदानाऐवजी इतर ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचे न्यायालयाने सांगितले. या मैदानाची स्थिती दोन दिवस जैसे थे असावी, असेही न्यायालयाने सरकारला सुनावले. इदगाह मैदानावर गणेशोत्सव साजरा करण्याबाबत कर्नाटक उच्च न्यायालयाने मैदानाची स्थिती जैसे थे ठेवण्यास सांगितले होते. आता सर्वोच्च न्यायालयानेही दोन दिवस वाट पाहण्यास सांगितले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT