राष्ट्रीय

फेक न्यूजच्या काळात सत्याचा बळी : सरन्यायाधीश चंद्रचूड

दिनेश चोरगे

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  आजच्या फेक न्यूजच्या काळात सत्याचा बळी जात आहे, अशी खंत भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केली. आजच्या काळात सहिष्णुतेचा अभाव हे सर्वात मोठे आव्हान असल्याचेही ते म्हणाले.

अमेरिकन बार असोसिएशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात चंद्रचूड म्हणाले की, एकीकडे जग प्रवास आणि तंत्रज्ञानामुळे जवळ आले असताना लोक मात्र संकुचित होत आहेत. सहिष्णुतेचा अभाव हे सर्वात मोठे आव्हान बनले आहे. समाजमाध्यमांचा वापर वाढल्यावर त्याचा कसाही वापर सुरू झाला. आज तो इतका बेबंद झाला आहे की, फेक न्यूजच्या आजच्या युगात सत्याचाच बळी जात आहे. न्यायमूर्तीसुद्धा ट्रोलिंगपासून वाचू शकलेले नाहीत, असे सांगून सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, आम्ही काहीही केले तरी ट्रोल होतो. अत्यंत कमी सहनशीलता असलेला हा काळ आहे. सहिष्णुता कमी झाली आहे; कारण आपल्याशिवाय इतरांची मते वेगळी असू शकतात, हेच मान्य केले जात नाही. आज समाजाला अशा बेबंद तंत्रज्ञानापासून धोका आहे त्याचे अनियंत्रित परिणाम होऊ शकतात.

SCROLL FOR NEXT