राष्ट्रीय

फेक न्यूज : 104 यूट्यूब चॅनल्स ब्लॉक

दिनेश चोरगे

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  खोटी आणि गैरसमज पसरवणारी माहिती दाखवणारी 104 यू ट्यूब चॅनल्स ब्लॉक करण्यात आली आहेत. सर्वोच्च न्यायालय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोग यांच्याबाबत धादांत खोटी माहिती देणारी यू ट्यूब चॅनल्स या आठवड्यात ब्लॉक करण्यात आली आहेत. या चॅनल्सला 30 कोटी प्रेक्षक आहेत तर 33 लाख सबस्क्रायबर्स आहेत.

केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, डिजिटल माध्यमांत फेक न्यूजचे प्रमाण रोखण्यासाठी सरकार वेळोवेळी कारवाई करत असते. खोट्या माहितीच्या आधारे समाजात द्वेष पसरवणे आणि फूट पाडण्याचे प्रयत्न करणार्‍या अशा यू ट्यूब चॅनल्सवर सरकारने आयटी अ‍ॅक्टच्या कलम 69 अ अन्वये कारवाई केली आहे. 104 यू ट्यूब चॅनल्स, 45 वैयक्तिक व्हिडीओ, चार फेसबुक खाती, तीन इन्स्टाग्राम खाती आणि पाच ट्विटर खाती तत्काळ ब्लॉक करण्यात आली आहेत. याशिवाय दोन अ‍ॅप्स आणि सहा वेबसाईटस्वर देखील कठोर कारवाई करण्यात आल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT