नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : पीएम मोदी मंत्रिमंडळाच्या जम्बो विस्तारानंतर दिल्लीत वेगवान घडामोडी घडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा नव्या टीमसोबत बैठक बोलावली आहे. ही बैठक बुधवारी 14 जुलै रोजी होईल.
मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर दुसऱ्यांदा पीएम मोदी यांनी ही मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. यापूर्वी, कॅबिनेट विस्तारानंतर दुसर्या दिवशी 8 जुलै रोजी त्यांनी सर्व मंत्र्यांशी चर्चा केली होती. त्यांच्या पुढील सभेचा मुद्दा काय असेल याविषयी आता हे चित्र स्पष्ट झालेलं नाही. परंतु पंतप्रधान कोरोनाच्या ताज्या परिस्थितीबद्दल चर्चा करू शकतात असा विश्वास आहे.
देशातील कोरोनाचा वेगम मंदावला आहे. परंतु अद्याप काही भयानक आकडेवारी काही राज्यांतून समोर येत आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी आपल्या मंत्र्यांना राज्यांकडे लक्ष देण्यास सांगू शकतात असा विश्वास आहे.
गेल्या बैठकीत मोदींनी कोरोनाबाबत देशातील दुर्लक्ष करण्याबद्दलही चिंता व्यक्त केली होती. ते म्हणाले की, 'गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणाहून गर्दीची छायाचित्रे समोर आली आहेत.
लोक मास्क आणि सामाजिक अंतराचे पालन करता फिरताना दिसतात. ही चांगली चित्रे नाहीत.
कोरोना वॉरियर्स आणि फ्रंटलाइन वर्कर्सच्या नेतृत्वात देशात साथीच्या रोगाविरोधात लढा सुरू आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेदरम्यान झालेल्या विध्वंसानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी लोकांना कोणत्याही प्रकारचा धोका टाळण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी काल (ता.०९) देशभरातील ऑक्सिजन पुरवठा वाढविण्यासाठी आढावा बैठक घेतली.
यावेळी देशाच्या विविध भागात ऑक्सिजन प्लांट्स बसविण्याचे काम जोरात सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
पीएम केअर फंड आणि विविध मंत्रालयांच्या सहकार्याने देशातील पंधराशेहून अधिक पीएसए ऑक्सिजन प्लांट्स उभारले जात आहेत.