राष्ट्रीय

न्यायाधीश यांच्यावरील अवमानकारक पोस्टप्रकरणी पाच जणांना अटक

Arun Patil

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : सर्वोच्च न्यायालय आणि आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश यांच्या संदर्भात सोशल मीडियावर अवमानकारक पोस्ट टाकल्याप्रकरणी सीबीआयने पाच जणांना अटक केली आहे. या प्रकरणात वायएसआर काँग्रेसचे खासदार नंदीगाम सुरेश यांच्यासह अमांची कृष्ण मोहन यांची भूमिकाही तपासून पाहिली जात आहे. मोठ्या षड्यंत्राच्या संशयावरून दोघांची चौकशीही करण्यात आल्याची माहिती एका अधिकार्‍याने दिली.

या प्रकरणात एक खासदार, माजी आमदारासह अन्य काही जणांची चौकशी केली आहे. यापैकी कोणाचेही नाव एफआयआरमध्ये नसल्याचे सीबीआयचे प्रवक्‍ते आर. सी. जोशी यांनी सांगितले.

सीबीआयने शनिवारी या प्रकरणात पत्तापू आदर्श आणि एल सांबा रेड्डी या दोन व्यक्‍तींना आंध्र प्रदेशातून अटक केली. त्यापूर्वी 28 जुलै रोजी धामी रेड्डी, कोंडा रेड्डी आणि पामुला सुधीर यांना अटक करण्यात आली होती. 9 जुलै रोजी सीबीआयने सध्या कुवेतमध्ये असलेल्या लिंगारेड्डी राजशेखर रेड्डी यांना भारतात आल्यानंतर अटक केली होती.

काय आहे प्रकरण

न्यायव्यवस्थेला लक्ष्य करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक न्यायाधीश यांच्या विरोधात सोशल मीडियावर अवमानकारक पोस्ट केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात 16 जणांविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला आहे. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणाचा तपास करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT