PM Narendr Modi
नकारात्मक राजकारण  सोडावं : पीएम मोदींचे विरोधकांना आवाहन X account
राष्ट्रीय

नकारात्मक राजकारण  सोडावं : पीएम मोदींचे विरोधकांना आवाहन

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजकारणामध्ये विरोधी मते असतातच. मात्र याचा परिणाम विकासकामावर होता कामा नये. देशातील जनतेने पाच वर्षांसाठी आम्हाला पुन्हा एकदा देशाची सेवा करण्याची संधी दिली आहे.  विरोधकांनी हे आता मान्य करावे. देशाच्या विकासात सहभागी व्हावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी ते माध्यमांशी आज (दि.२२) बोलत होते. (PM Narendr Modi)

हा अर्थसंकल्प विकसित भारताच्या स्वप्नांना बळ देईल

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (दि.२२) सुरुवात झाली आहे. तर हे अधिवेशन  १२ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. उद्या (दि.२३) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण अर्थसंकल्प मांडणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,

उद्या (दि.२३) आपण जो अर्थसंकल्प सादर करणार आहोत तो अमृतकालचा महत्त्वाचा अर्थसंकल्प आहे. . देशातील जनतेने पाच वर्षांसाठी आम्हाला पुन्हा एकदा देशाची सेवा करण्याची संधी दिली आहे.  आम्हाला पाच वर्षांची संधी मिळाली आहे, हा अर्थसंकल्प त्या पाच वर्षांसाठी आमची दिशा ठरवेल. हा अर्थसंकल्प २०४७ पर्यंत विकसित भारताच्या स्वप्नांना बळ देईल. आम्ही मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पुर्ती करणार. असेही ते म्हणाले.

देशासाठी लढायचे आहे...

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये भारत हा सर्वात वेगाने वाढणारा देश आहे ही प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाची बाब आहे. मी देशातील सर्व पक्षांच्या खासदारांना विनंती करतो  की, सर्व राजकीय पक्षांची विशेष जबाबदारी आहे की येत्या पाच वर्षे देशासाठी लढायचे आहे, 

SCROLL FOR NEXT