नवी दिल्ली; वृत्तसंस्था : रिझर्व्ह बँकेने देशातील 13 बँकांविरोधात नियम उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली आहे. या बँकांना 50 हजार ते 4 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला आहे.
चंद्रपूर येथील कन्यका नागरी सहकारी बँकेला 4 लाखांचा, तर बीड येथील वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला अडीच लाख रुपये दंड ठोठावला आहे. वाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक (सातारा), इंदूर प्रीमियर को-ऑपरेटिव्ह बँकेला आरबीआयने प्रत्येकी दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. पाटण नागरी सहकारी बँक, पाटण आणि तुरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेलाही (मेघालय) दीड लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
नागरी सहकारी बँक मर्यादित, जगदलपूर, जिजाऊ व्यावसायिक सहकारी बँक, अमरावती, ईस्टर्न आणि नॉर्थ-ईस्ट फ्रंटियर रेल्वे को-ऑप बँक, कोलकाता, जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक लिमिटेड, छतरपूर, नागरी सहकारी बँक मर्यादीत, रायगड, जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक लिमिटेड, बिलासपूर तसेच जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक मर्यादित, शहडोल या बँकांना दंड करण्यात आला.