नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : गतवर्षीच्या दसर्याच्या शुभ मुहूर्तावर शेअर बाजारातील ज्या 44 स्मॉलकॅप शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी आपली रक्कम गुंतवली, ते या दसर्याला मालामाल झाले आहेत. कारण त्यांना या शेअर्समुळे एका वर्षाच्या कालावधीत घसघशीत परतावा मिळाला आहे. खरे तर, यावेळी व्यापक स्तरावरचे आर्थिक वातावरण आणि वाढत्या व्याजदराशी संबंधित चिंतेमुळे या कालावधीत सेन्सेक्स 6 % पेक्षा जास्त अंशांनी घसरला. तरीही या शेअर्सची कामगिरी कौतुकास्पद म्हटली पाहिजे.
उदाहरणार्थ आय टी एनेबल्ड सर्व्हिसेस (आयटीईएस) क्षेत्रातील क्रेसांडा सोल्युशन्स कंपनीचा शेअर, याचे बाजारपेठीय भांडवल 1400 कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. पण, 2021 च्या दसर्यापासून स्मॉलकॅप जगतात तो अव्वल स्थानावर आहे. सुमारे 1500% च्या उत्साहवर्धक रॅलीसह हा शेअर 2 रुपयांवरून 34 रुपयांवर गेला. केपीआय ग्रीन एनर्जीच्या शेअर्सने देखील या कालावधीत तडाखेबंद फलंदाजासारखी
उत्तम कामगिरी केली. त्यांच्यात जवळपास 500% ची वाढ झाली. तर ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्हज, मिर्झा इंटरनॅशनल आणि
ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्सने 375 ते 424 % पर्यंत नफा कमावला आहे.
इतर स्मॉलकॅप्स जे या कालावधीत दुप्पट झाले, त्यामध्ये चॉईस इंटरनॅशनल, साधना नायट ?ो केम, फिनोटेक्स केमिकल, डीबी
रियल्टी, लॉयड्स स्टील्स इंडस्ट ?ीज, शॉपर्स स्टॉप, राजरतन ग्लोबल वायर आणि टीजीव्ही एसआरएसीसी यांचा समावेश आहे.
शेअर परतावा
शिवालिक बायमेटल कंट्रोल्स 160. 27%
विष्णू केमिकल्स 154, 67 %
अरिहंत कॅपिटल मार्केट्स 150 %
वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज 143. 39 %
जगसनपाल फार्मास्युटिकल्स 134 . 54 %
मोनार्क नेटवर्थ कॅपिटल 133. 22 %
बेएल एस इंटरनॅशनल सर्व्हिसेस 132 . 76 %
वाडीलाल इंडस्ट्रीज 130. 61 %
रेमंड 130. 26 %
पंजाब अल्कली आणि केमिकल्स 128. 5 %
राधे डेव्हलपर्स (इंडिया ) 128. 41