झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडले Pudhari File Photo
राष्ट्रीय

झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यात ६८.४५ टक्‍के मतदान

Jharkhand Election News | प्रमुख उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्‍ली : झारखंड विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात ३८ जागांसाठी मतदान पार पडले. मतदान संपल्‍यानंतर एकूण ६८.४५ टक्‍के मतदान झाले. राजमहल, बोरियो, बरहेट आदी मतदारसंघात आज मतदान पार पडले. या टप्प्यामध्ये झामुमोचे नेते व मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे बरहेट मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. तर त्‍यांच्या पत्‍नी कल्‍पना सोरेन या गांडेय विधानसभा मतदारसंघातून उमेदवार आहेत. नक्षलग्रस्त गिरिडीह जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी यावेळी वाढलेली आहे.

या टप्प्यात एकूण ५२८ उमेदवारांचे भवितव्य इव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मते, ५ वाजेपर्यंत जामतारा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ७६.१६ टक्के मतदान झाले आहे. तर सर्वात कमी मतदान बोकारो जिल्ह्यामध्ये ६०.९७ टक्के झाले आहे. या टप्प्यात एकूण १४,२१८ मतदान केंद्रे आहेत. यामध्ये २३९ मतदान केंद्रावर संपूर्ण महिला अधिकाऱ्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

जिल्हानिहाय टक्केवारी

बोकारो : 60.97 टक्के

देवघर : 72.46 टक्के

धनबाद : 63.39 टक्के

दुमका : 71.74 टक्के

गिरिडीह : 65.89 टक्के

गोड्डा : 67.24 टक्के

हजारीबाग : 64.41 टक्के

जामतारा : 76.16 टक्के

पाकूर : 75.88 टक्के

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT