राष्ट्रीय

जगावेगळे करण्याच्या नादात तरुणांनी बाईकवरच पेटवली शेकोटी

दिनेश चोरगे

इंदौर : सोशल मीडियावर टाकलेले व्हिडीओ बघण्याचे प्रमाण जसे वाढले तसे अधिकाधिक लाईक मिळवण्यासाठी तरुणाई आपला जीव धोक्यात घालून जगावेगळे व्हिडीओ बनवत आहेत. यातूनच इंदौरमधील दोन तरुणांनी चालत्या बाईकवरच शेकोटी पेटवत त्याचा व्हिडीओ बनवला आणि तो पोस्ट केला. त्यांच्या या व्हिडीओला अपेक्षित लाईक्स मिळाल्या; पण पोलिसांकडून असले प्रकार पुन्हा न करण्याची सक्त ताकीदही मिळाली.

सध्या देशभर हुडहुडी भरवणारी थंडी पडली आहे. जागोजागी शेकोट्या पेटवून लोक बसलेले दिसत आहेत. अशा वातावरणाचा फायदा घेत बनवलेल्या या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, दोन तरुण रात्री बाईकवरून जात असून मागे बसलेला तरुण चालकाच्या पाठीला पाठ लावून बसला आहे. दोन पायांच्या मध्ये पेटलेली शेकोटी ठेवलेली असून तो शेकत आहे. बाईकच्या वेगामुळे वारा उलट्या दिशेने वाहत असल्याने या तरुणाला शेकोटीच्या ज्वालांचा धोका जाणवत नाही. मात्र इतर वाहन चालकांना या शेकोटीचा धोका आहे. पोलिसांना हा प्रकार निदर्शनास आल्यावर त्यांनी असा विचित्र प्रकार का करताय, असे विचारल्यावर सोशल मीडियासाठी व्हिडीओ बनवत असल्याचे तरुणांनी सांगितले. मात्र यामध्ये मोठा धोका असून पुन्हा असे न करण्याची ताकीद पोलिसांनी तरुणांना दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT