राष्ट्रीय

चार कोटी 92 लाखांचा अपहार करणार्‍या मॅनेजर महिलेस अटक

दिनेश चोरगे

बंगळूर; वृत्तसंस्था :  वेगवेगळ्या ग्राहकांच्या खात्यांतील तब्बल चार कोटी 92 लाख रुपयांची रक्कम आपल्या खात्यांत वळवून भ्रष्टाचार करणार्‍या एका महिला बँक मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. तिने गतवर्षी जून ते डिसेंबर या काळात ही रक्कम हडप केली होती.

अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव सजिला असून, ती आयडीबीआय बँकेच्या मिशन रोड शाखेत रिलेशनशिप मॅनेजर म्हणून काम करते. तिने हा प्रकार करताना फक्त गब्बर ग्राहकच निवडले. जेणेकरून पैसे वळवल्याचे मेसेज गेले तरी त्यांच्या ते लक्षात येणार नाही. असे गर्भश्रीमंत ग्राहक तिने निवडले व त्यांच्या खात्यांतून वेळोवेळी रक्कम आपल्या विविध खात्यांत वळती केली. ही रक्कम 4 कोटी 92 लाख रुपयांची असून, तिने त्यातील बरीच रक्कम एलआयसीच्या बाँडमध्ये गुंतवली. पोलिसांनी हा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर तिचा संगणक जप्त केला असून, 23 लाख रुपयांची रोकडही जप्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT