नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशात कोरोना महारोगराईमुळे आतापर्यंत ४ लाख ५ हजार ९३९ रूग्णांचा (१.३२%) मृत्यू झाला. गुरूवारी दिवसभरात ९११ रूग्णांचा मृत्यू झाला.
गेल्या एका दिवसात ४३ हजार ३९३ कोरोनाबाधितांची भर पडली. तर, ४४ हजार ४५९ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली. शुक्रवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९७.१९% नोंदवण्यात आला.
देशात आतापर्यंत २ कोटी ९८ लाख ८८ हजार २८४ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. ४ लाख ५८ हजार ७२७ रूग्णांवर (१.४९%) उपचार सुरू आहे. गेल्या एका दिवसात सक्रिय रूग्णसंख्येत १ हजार ९७७ ने घट झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनूसार गेल्या एका दिवसात केरळमध्ये सर्वाधिक १३ हजार ७७२ कोरोनाबाधितांची भर पडली. केरळपाठोपाठ महाराष्ट्र ९,०८३, तामिळनाडू ३,२११ , आंधप्रदेश २,९८२ तसेच ओडिशामध्ये २ हजार ५४२ कोरोनाबाधित आढळले.
आतापर्यंत कोरोना लसीचे ३६ कोटी ८९ लाख ९१ हजार २२२ डोस लावण्यात आले आहेत. यातील ४० लाख २३ हजार १७३ डोस गुरूवारी लावण्यात आले.
देशातील कोरोना तपासण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. गेल्या एका दिवसात १७ लाख ९० हजार ७०८ कोरोना तपासण्या करण्यात आल्या. आतापर्यंत ४२ कोटी ७० लाख १६ हजार ६०५ तपासण्या करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.
सप्टेंबरमध्ये लहान मुलांना 'कोरोना लस' मिळण्याची शक्यता
भारतात १२ ते १८ वर्षांच्या मुलांना 'जायडस कॅडिला' नावाची करोनावरील लस ही सप्टेंबरमध्ये मिळू शकते. लसीकरणावर गठीत करण्यात आलेल्या समितीतील तज्ज्ञ प्रमुखांनी हे संकेत दिलेले आहेत.
जाइडस कॅडिला या कोरोनावरील लसीचे मुलांवर केलेल्या प्रयोगांचे निष्कर्ष सप्टेंबरच्या अगोदरच मिळण्याची आशा आहे. नॅशनल एक्स्पर्ट ग्रूप ऑन वॅक्सीनचे प्रमुख डाॅ. एन. के. अरोरा यांनी ही माहिती दिली आहे. एका वृतीवाहिनीशी दिलेल्या मुलाखतीत डाॅ. अरोरा म्हणाले की, "जाइडसच्या लसीला आतपकालीन वापरासाठी हिरवा सिग्नल काही आठवड्यांमध्ये मिळेल."
देशातील कोरोनासंबंधी आकडेवारी
दिनांक तपासण्या कोरोनाबाधित संसर्ग दर
१) ३० जून १९,६०,७५७ ४५,९५१ २.३४%
२) १ जुलै १९,२१,४५० ४८,७८६ २.५४%
३) २ जुलै १८,५९,४५९ ४६,६१७ २.४८%
४) ३ जुलै १८,७६,०३६ ४४,१११ २.३५%
५) ९ जुलै १७,९०,७०८ ४३,३९३ २.४२%