Arvind Kejriwal
केजरीवाल यांच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाची ईडीला नोटीस  File Photo
राष्ट्रीय

केजरीवाल यांच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाची ईडीला नोटीस

सोनाली जाधव

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात आहेत. तुरुंगात असताना वकिलांना आठवड्यातून ४ वेळा भेटण्याची मागणी करणारी याचिका केजरीवालांनी दाखल केली होती. या याचिकेवर सोमवारी (८ जुलै) दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने तिहार तुरुंग अधिकारी आणि ईडीला नोटीस बजावली असुन ७ दिवसांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १५ जुलै रोजी होणार आहे. Arvind Kejriwal

केजरीवाल यांचे याचिकेत म्हणणे काय?

“माझ्याविरुद्ध देशभरात ३५ वेगवेगळे खटले प्रलंबित आहेत. सध्या मला आठवड्यातून दोनदाच वकिलांना भेटण्याची परवानगी आहे. किमान चार वेळा वकिलांना भेटण्याची परवानगी द्यावी.” अशी मागणी केजरीवालांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केली होती.

दरम्यान, केजरीवाल यांनी यापूर्वीही तुरुंगात दोन अतिरिक्त भेटींसाठी राऊस अव्हेन्यु न्यायालयात याचिका दाखल केली होती. यादरम्यान ते म्हणाले होते की, या अतिरिक्त दोन बैठका दुरदृष्यप्रणालीद्वारेही घेतल्या जाऊ शकतात. मात्र, विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी ही याचिका फेटाळली होती. त्यानंतर केजरीवालांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

SCROLL FOR NEXT