राष्ट्रीय

इसिसचा हल्लेखोर अब्बासीला मृत्युदंड

दिनेश चोरगे

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : उत्तर प्रदे शातील गोरखपूर येथील प्रसिद्ध गोरखनाथ मंदिरात घुसण्यासाठी दोन पोलिसांवर शस्त्राने हल्ला केलेल्या अहमद मुर्तझा अब्बासी याला विशेष एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था ) न्यायालयाने मृत्युदंड सुनावला आहे.

अब्बासी हा आयआयटी बॉम्बे संस्थेचा पदवीधर आहे. सलग ६० दिवस सुनावणी घेऊन विक्रमी वेळेत या खटल्याचा निकाल जाहीर करण्यात आला. ३ एप्रील २०२२ रोजी हा हल्ला झाला होता. अब्बासीने २०१३ पासून अन्सार उल तौहिद या दहशतवादी संघटनेचे काम सुरू केले होते. २०१४ मध्ये ही संघटना इसिसमध्ये विलीन करण्यात आली होती. त्याने २०२० मध्ये इसिसची शपथ घेतली होती, असे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरखनाथ मंदिराचे महंत (मुख्य) आहेत आणि त्यांचे निवासस्थानही याच परिसरात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT