राष्ट्रीय

आर्किटेक्ट युवतीकडून बंगळुरात लिव्ह इन पार्टनर डॉक्टरची हत्या

मोहन कारंडे

बंगळूर; वृत्तसंस्था : आर्किटेक्ट तरुणीने आपल्या लिव्ह इन पार्टनरची (डॉ. विकास) हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. डॉक्टरने खासगी फोटो फेसबुकवर अपलोड केल्याच्या रागातून तिने हे कृत्य केले. मुख्य आरोपी आर्किटेक्ट प्रतिभा, तिचे मित्र गौतम व सुशील यांना पोलिसांनी अटक केली. एक आरोपी सूर्या हा फरार आहे.

वर्षभरापूर्वीच विकास व प्रतिभाने उडुपी गार्डनजवळ भाड्याने घर घेतले होते. ते लिव्ह इनमध्ये राहत होते आणि दोघे पुढे लग्न करणार आहेत, याची माहिती कुटुंबीयांनाही होती. विकास याने प्रतिभा व तिच्या आईचे खासगी फोटो सोशल मीडियावर बोगस ओळखपत्राच्या मदतीने खाते उघडून शेअर केल्याचे समजले. 10 सप्टेंबर रोजी तिने विकासला याचा जाब विचारला. दोघांत कडाक्याचे भांडण झाले. प्रतिभाने आपल्या अन्य 3 मित्रांना हे कळवले. मित्र घरी आले तसा पुन्हा वाद पेटला. प्रतिभाने विकासला बाटली फेकून मारली. काठीनेही मारले. जखमी विकासला प्रतिभानेच रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT