राष्ट्रीय

‘आयटी’ची नोकरी सोडली अन् गौडांना गाढव पावले!!

मोहन कारंडे

बंगळूर : वृत्तसंस्था
मी आता गाढव फार्म टाकणार आहे, असे तुम्ही कुणाला सांगितले तर तो विनोदाचा विषय ठरेल. व्यवसायाचा नाही; पण कर्नाटकमधील मंगळूर येथील श्रीनिवास गौडा (वय 42) या आयटी इंजिनिअरने सहा आकडी पगाराची नोकरी सोडून दक्षिण कन्नड जिल्ह्यात चक्क गाढव फार्म टाकला.

गौडांचा गाढव फार्म देशातला दुसरा फार्म आहे. याआधी केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यात एक फार्म सुरू झालेला आहे. विशेष म्हणजे, गौडा यांना गाढवींच्या दुधाची पहिलीच ऑर्डर 17 लाख रुपयांची मिळाली! गौडांनी 2020 मध्ये नोकरी सोडली आणि इरा या खेड्यात करिअरची दुसरी इनिंग सुरू केली. 2.3 एकरमध्ये एकाच छताखाली गोट फार्म, कडकनाथ कोंबडी पालन केंद्र असे बरेच काही. जोडीला 'डाँकी फार्म'ही! गाढवांनी गौडांची फार परीक्षाही घेतली नाही. लगोलग मोठी ऑर्डर मिळाली आणि गौडांना गाढव पावले!!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT