राष्ट्रीय

अवघ्या 36 तासांत विषाणू एका गावातून जगभरात; ‘डब्ल्यूएचओ’च्या माजी मुख्य शास्त्रज्ञाचा दावा

दिनेश चोरगे

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : एखाद्या दुर्गम भागातील खेड्यातून कुठलाही विषाणू अवघ्या 36 तासांत जगभरात पोहोचू शकतो, असे मत जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी व्यक्त केले.

ग्लोबल वॉर्मिंग, जंगलतोड, शहरीकरण, वन्य आणि पाळीव प्राण्यांचा परस्पर संपर्क, बेकायदा वन तस्करी आणि जागतिकिकरणाने विषाणूचा हा द्रुतगती प्रवास शक्य केलेला आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. आपण त्यामुळेच साथरोगाच्या प्रादुर्भावाला
अटकाव करण्यास असमर्थ ठरत आहोत. किंबहुना ही गोष्टच आता मानवाच्या आवाक्याबाहेरची आहे, असेही डॉ. सौम्या यांनी स्पष्ट केले.

SCROLL FOR NEXT