Yusuf Pathan visits disputed Adina mosque :
कोलकाता : माजी क्रिकेटपटू आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार युसूफ पठाण यांनी नुकतीच पश्चिम बंगालमधील आदिना मशिदीला भेट दिली. यानंतर त्यांनी एक्स पोस्ट करत येथील वास्तुशिल्पाचेही कौतूक केले. मात्र यानंतर वाद सुरु झाला आहे. भाजपसह सोशल मीडियावरील सोशल मीडिया वापरकर्त्यांनी ते आदिनाथ मंदिर असल्याचे म्हटले आहे. ऐतिहासिक संदर्भ आणि त्या जागेवरील भगवान गणेश आणि शिव यांच्यासारख्या देवतांच्या स्पष्ट प्रतिमा देखील ऑनलाइन शेअर करण्यात आल्या. युसूफ पठाण यांच्या भेटीनंर आदिना मशिदी की आदिनाथ मंदिर? हा दीर्घकाळ चाललेला वाद पुन्हा सुरू झाला आहे.
युसूफ पठाण पठाण यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये आदिना मशिदीला वास्तुशिल्पाचा चमत्कार म्हटले. आदीना मशीद ही १४ व्या शतकात इलियास शाही राजवंशाचा दुसरा शासक सुलतान सिकंदर शाह यांनी बांधलेली एक मशीद आहे. १३७३-१३७५ मध्ये बांधलेली ही मशीद भारतीय उपखंडातील त्या काळातील सर्वात मोठी मशीद पैकी एक होती. प्रदेशाच्या स्थापत्य वैभवाचे प्रदर्शन करते," पठाण यांनी ट्विट केले. मात्र यानंतर त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका सहन करावी लागली, वापरकर्त्यांनी पठाण यांच्यावर या रचनेच्या कथित उत्पत्तीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. "सुधारणा: आदिनाथ मंदिर," भाजपच्या बंगाल युनिटने ट्विट केले.
आदिना मशिदी की आदिनाथ मंदिर? वाद पहिल्यांदा २०२२ मध्ये सुरू झाला. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष रथींद्र बोस यांनी ट्विट केले की, आदिनाथ मंदिर हे मशिदीच्या रचनेखाली गाडले गेले आहे. तो इतिहास अनेकांना माहीत नाही." वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यासह अनेक राज्यांमध्ये मंदिर-मशीद वाद वाढू लागल्याने ही पोस्ट करण्यात आली होती. २०२४ मध्ये हिंदू पुजारी हिरण्मय गोस्वामी यांनी भाविकांच्या गटाचे नेतृत्व करून आदिना मशिदीच्या आवारात पूजा केल्यानंतर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. गोस्वामींनी त्यांच्या भेटीदरम्यान हिंदू संस्कृतीशी संबंधित शिवलिंग आणि इतर चिन्हे सापडल्याचा दावा केला. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हादाखल करण्यात आला.
ज्ञानवापी आणि कृष्णजन्मभूमी प्रकरणांमध्ये सहभागी असलेले ज्येष्ठ वकील हरि शंकर जैन यांनी आदिना मशिदी की आदिनाथ मंदिर? वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिल्यानंतर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. मिळाला. त्यांच्या पत्रात, जैन यांनी हिंदूंना मशीद संकुलात पूजा करण्याची परवानगी मागितली होती. ज्येष्ठ वकिलांनी X वर एक व्हिडिओ संदेश देखील पोस्ट केला. "ते एक भव्य हिंदू मंदिर होते. त्यातील अनेक चिन्हे अजूनही आहेत. एक नाही तर तब्बल 32 छायाचित्रे आहेत जी स्पष्टपणे दर्शवितात की हे एक भव्य मंदिर होते आणि ते पाडण्यात आले," जैन म्हणाले. या संपूर्ण प्रकरणी एएसआयने तटस्थ भूमिका कायम ठेवली आहे, असे म्हटले आहे की आदिना मशीद राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक राहिले आहे.