पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्ली विधानसभा निवडणुक मतमोजणीला आज शनिवारी सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या ७० जागांपैकी ३६ जागा बहुमतांसाठी गरजेच्या आहेत. सुरूवातीच्या कलानुसार, भाजप ५०, आप १९, तर काँग्रेस केवळ एका जागेवर आघाडीवर आहे.
सुरूवातीच्या कलानुसार, दिल्ली विधानसभा निवडणुकांत सत्ताधारी आम आदमी पार्टी बॅकफूटवर पडली आहे. तर भारतीय जनता पार्टी २७ वर्षीनंतर दिल्लीत कमबॅक करण्याच्या उंबरठ्यावर आहे. आपचे दिग्गज अरविंद केजरीवाल, आतिशी आणि सिसोदिया हे सर्वजण पोस्टल मतपत्रिकांच्या मोजणीत मागे पडले आहेत.
आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्ली मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. येथून भाजपचे प्रवेश वर्मा आघाडीवर आहेत. त्याचबरोबर जंगपुरा येथून माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि कालकाजी येथून दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी देखील पिछाडीवर पडल्या आहेत.