UP Crime News
अविवाहित असल्याचे सांगून तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले file photo
राष्ट्रीय

२ मुलांच्या बापाचा अल्पवयीन मुलीवर जीव जडला, लग्नाला नकार देताच...

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील दुंदहेरा येथे एका अल्पवयीन मुलीने लग्न करण्यास नकार दिल्याने विवाहित तरुणाने तिच्यावर गोळ्या झाडल्या. बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. मुलीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला दिल्लीला रेफर करण्यात आले असून पोलिसांनी संशयीत आरोपीला अटक केली आहे.

दुंडाहेरा येथील रवी हा विवाहित असून दोन मुलांचा बाप आहे. दीड वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तो त्याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणीच्या संपर्कात आला. अविवाहित असल्याचे सांगून त्याने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. काही दिवसांपूर्वी रवीचे लग्न झाल्याचे मुलीला समजल्यानंतर तिने त्याच्याशी बोलणे बंद केले होते. त्यानंतर तो मुलीवर आणि तिच्या कुटुंबीयांवर लग्नासाठी दबाव टाकत होता. मुलीच्या आईने सांगितले की, बुधवारी संध्याकाळी तो घरी आला आणि त्याने मुलीचे लग्न आपल्याशी करणार की नाही, असे विचारले. आईने नकार देतचा त्याने स्वयंपाक करत असलेल्या पीडित मुलीच्या डोक्यात गोळी झाडली. यानंतर तो पळून गेला. मुलीला तात्काळ जिल्हा एमएमजी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला दिल्लीला रेफर करण्यात आले.

तरुण विवाहित असल्याचे समजताच बोलणे बंद केलं

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मुलगी रवी याच्यासोबत फोनवर बोलत होती. मात्र तो विवाहित असल्याचे समजताच तिने बोलणे बंद केले. बुधवारी तो घरी आला आणि लग्नाबाबत विचारू लागला. त्याला नकार दिल्याने त्याने हा प्रकार घडवून आणला. डीसीपी ग्रामीण विवेक यादव यांनी सांगितले की, 'रवी आणि अल्पवयीन मुलीची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली. विवाहित असूनही रवी तरुणीवर लग्नासाठी दबाव टाकत होता. त्याला नकार दिल्याने त्याने गोळी झाडली.

SCROLL FOR NEXT