कुस्तीपटू विनेश, बजरंग पुनिया यांच्या नोकरीचा राजीनामा स्वीकारला File Phot
राष्ट्रीय

कुस्तीपटू विनेश, बजरंग पुनियाच्या नोकरीचा राजीनामा रेल्वेने स्वीकारला

vinesh phogat-bajrang punia | काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्य जाहीर प्रवेश

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतीय कुस्तीपटू कुस्तीपटू विनेश, बजरंग पुनिया या दोघांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. तत्पूर्वी त्यांनी उत्तर रेल्वेमधील आपल्या सरकारी पदांचा राजीनामा दिला होता. भारतीय उत्तर रेल्वेने या दोघांचाही राजीनामा आज (दि.९ सप्टें) स्विकारला आहे, या सदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.

विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांची राजकीय आखाड्यात एंट्री

भारताची माजी कुस्तीपटू विनेश फोगाट यांनी राजकीय आखाड्यात जाण्याचा निर्णय घेतला. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भेटीनंतर विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी ६ सप्टेंबर रोजी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते पवन खेरा, हरियाणा काँग्रेसचे प्रमुख उदय भान आणि हरियाणाचे एआयसीसी प्रभारी दीपक बाबरिया हे देखील उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT