अयोध्याः जानेवारी महिन्यात अयोध्यामध्ये राम मंदिराच्या उद्घाटनानंतर पहिली दिवाळी साजरी होत आहे. मागील चर्षी शरयू नदी काठावर २५ लाख दिवे लावण्यात आले होते. यंदा मागील वर्षीचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला गेला आहे. यंदाच्या दीपोत्सवात २५ लाख १२ हजार ५८५ दिवे शरयू नदी काठी प्रज्ज्वलीत करण्यात आले होते. हा एक विश्वविक्रम आहे. याप्रसंगी सुरवातीला ११२१ साधकांनी एकाचवेळी केली शरयू नदीची महाआरती केली.
या दिपोत्सवात चौधरी चरण सिंह घाटावर स्वस्तिकाच्या आकारात मांडलेल्या ८० हजार दिवे लक्षवेधी ठरले. शरयू घाटांवर ५,०००ते ६,००० पाहुण्यांच्या राहण्याची व्यवस्था पूर्ण झाली आहे. या नेत्रदीपक व ऐतिहासिक सोहळ्याचे चाळीस जंबो एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून थेट प्रक्षेपणही करण्यात आले. या दीपोत्सवात म्यानमार, नेपाळ, थायलंड, मलेशिया, कंबोडिया आणि इंडोनेशिया या सहा देशांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच उत्तराखंडमधील राम लीला पथकाचे सादरीकरण झाले. उत्तर प्रदेशच्या पशुसंवर्धन विभागाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना १५०,००० 'गौ दीप' प्रज्वलित केले. ३०,०००हून अधिक स्वयंसेवकांनी घाट सजवण्याच्या कामात सहभाग घेतला.