पुढारी ऑनलाईन डेस्क : आज जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निरोगी आणि सशक्त समाज घडवण्याचा संदेश दिला आहे. चांगले आरोग्य हा प्रत्येक समृद्ध समाजाचा पाया आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त आपण सर्वांनी निरोगी जग घडवण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करूया. आपले सरकार आरोग्यसेवेवर सातत्याने लक्ष केंद्रित करत असून लोकांच्या कल्याणाच्या विविध पैलूंमध्ये गुंतवणूक करत राहील, असे मोदींनी सांगितले. चांगले आरोग्य हा प्रत्येक समृद्ध समाजाचा पाया असल्याचे नमूद करत मोदींनी नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.