Treasure trove
केरळ राज्‍यातील कन्‍नूर जिल्‍ह्यात एका खासगी रबर मळ्यात रोजंदारी महिला कामगारांनी रेनवॉटर हार्वेस्टिंग खड्डा खोदताना खजिना सापडला आहे.  Twitter
राष्ट्रीय

'रेन वॉटर हार्वेस्टिंग'साठी खड्‍डा खोदताना सापडला 'खजिना'!

पुढारी वृत्तसेवा

केरळ राज्‍यातील कन्‍नूर जिल्‍ह्यात एका रबर मळ्यात रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी खड्डा खोदताना महिला कामगारांना खजिना सापडला. पुरातत्व विभागाच्या सखोल तपासणीनंतरच त्‍याचे मूल्य स्‍पष्‍ट होणार असल्‍याचे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे.

सोन्‍या -चांदीची नाणी, मौल्यवान मणी...

कन्‍नूर जिल्‍ह्यातील चेंगलयी येथील एका खासगी रबर मळ्यात महिला रोकामगार रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी खड्डा खोदत होत्‍या. यावेळी त्‍यांना एक डब्‍बा आढळला. सुरुवातीला हा बॉम्‍ब असावा, असा संशय त्‍यांनी व्‍यक्‍त केला. तर काहींना हा 'काळी जादू'चा प्रकार असल्‍याचाही दावा केला. अखेर त्‍यांनी मोठ्या धैर्याने सापडलेला डब्‍बा उघडला. तेव्‍हा त्‍यामध्‍ये सोन्‍या -चांदीची नाणी, मौल्यवान मणी, लॉकेट आढळले.

महिला कामगारांनी या घटनेची माहिती स्‍थानिक पोलिसांना दिली. पोलिसांनी खजिना जप्‍त केला. जप्‍त केलेला सर्व मुद्देमाल न्‍यायालयाकडे सुपूर्द केला आहे, आम्ही पुरातत्व विभागाला या खजिन्‍याची माहिती दिली आहे. त्‍याच्‍या तपासणीनंतर तो किती पुरातन आहे, याबाबत माहिती मिळेल, असे स्‍थानिक पोलीस अधिकार्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

SCROLL FOR NEXT