Leena Mehendale Pudhari
राष्ट्रीय

Sahitya Sammelan Delhi | नवी दिल्ली येथे महिला शासकीय अधिकाऱ्यांचे साहित्य संमेलन: संमेलनाध्यक्षपदी लीना मेहेंदळे यांची निवड

संमेलनाच्या निमंत्रक आर. विमला तसेच स्वागताध्यक्ष सुप्रिया देवस्थळी यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती

पुढारी वृत्तसेवा

New Delhi Women Government Officers Sahitya Sammelan

नवी दिल्ली : नवी दिल्ली येथे आयोजित महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवृत्त सनदी अधिकारी लीना मेहंदळे यांची एकमताने निवड करण्यात आल्याची घाेषणा संमेलनाच्या निमंत्रक आर. विमला तसेच स्वागताध्यक्ष सुप्रिया देवस्थळी यांनी शुक्रवारी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली. 

सरहद, पुणे आणि नवीन महाराष्ट्र सदन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मराठी भाषा विभागाच्या सहकार्याने हे दोन दिवशी संमेलन ११ आणि १२ एप्रिलला आयोजित करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या ३५१ व्या जयंतीचे औचित्य साधून या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

भारतीय प्रशासकीय सेवेतील १९७४ बॅचच्या लीना मेहेंदळे यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे झाला. त्या महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव सामान्य प्रशासन या पदावरून सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांनी गाेवा राज्याच्या मुख्य माहिती अधिकारी पदाची जबाबदारीही सांभाळली आहे. महसूल, प्रशासन, प्रशासकीय कायद्याची अंमलबजावणी, विकास प्रशासन, कार्यालयीन कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असे विविध महत्वाचे विषय त्यांनी हाताळले आहेत. त्यांनी राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

लीना मेहेंदळे यांचे विविध विषयांवर ५०० पेक्षा अधिक लेख आणि २४ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी कवी कुसुमाग्रजांच्या कवितांचा हिंदी भाषेत अनुवाद केला आहे. त्यांची १९ पुस्तके अनुवादाची आहेत. एका मराठी नाटकाचा व एका कादंबरीचाही त्यांनी अनुवाद केला आहे. 'द लास्ट पास' ही इंग्रजी भाषेतील कादंबरी त्यांनी मराठीत अनुवादित केली. लहान मुलांसाठी देखील त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. पक्षीनिरीक्षण, निसर्गाेपचार, प्रशासकीय सुधारणा, संगीत हे त्यांचे आवडते विषय आहेत. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT